सकाळच्या सत्रात बस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता उशीर होत आहे आणि खासगी बसगाडीने गेले तर शिल्लक पैसे द्यावे लागतात. त्यामुळे पणज येथील पालकांनी व विद्यार्थ्यांनी २ फेब्रुवारी रोजी अकोट आगारप्रमुखांना भेटून निवेदन दिले होते. मात्र बसगाडी सुरू केली नाही. तसेच बसगाड्यांना थांबाही दिला नाही. त्यामुळे पुन्हा बुधवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोचे यांनी विद्यार्थ्यांसोबत निवेदन दिले. बसगाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. परतवाडा डेपोची बसगाडी चालकाने पणज येथे न थांबविल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता उशीर झाला. आगारप्रमुखांनी परतवाडा डेपोच्या प्रमुखांशी बोलून घडलेल्या घटनेची माहिती दिली. वडाळी देशमुख बसगाडी पणज बस्थानकावरून सुरू करण्यासोबतच गुरुवारपासून सकाळची खिरकुंड फेरी सुरू करण्याचे आश्वासन दिले. या वेळी दिनेश बोचे, सौरभ बुंदेले, धीरज बेलसरे, सुजल महाले, यश आकोटकर, प्रज्वल अकोटकर, यश आवंडकार, प्रणव अकोटकर, गौरव अकोटकार, रेखाते आदी विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो: