अकोला : पातूर तालुक्यातील तुलंगा येथील किसान विद्यालयात कार्यरत शिक्षकाची बदली झाल्यामुळे ही बदली रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता माध्यमिक शिक्षणाधिकार्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिक्षणाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनानुसार, पातूर तालुक्यातील तुलंगा येथील किसान विद्यालयात कार्यरत शिक्षक अ. रा. पोरे यांची बदली करण्यात आली. पोरे यांची बदली झाल्यापासून विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे बंद केले. सदर शिक्षक उत्कृष्ट शिक्षण देत होते, तर शाळेची शिस्तही कडक होती. त्यांची बदली झाल्यापासून शाळाच भरत नसल्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी. जर शिक्षकाची बदली रद्द करण्यात आली नाही, तर विद्यार्थ्यांंसह उपोषणाल बसण्याचा इशारा निवेदनात गावकर्यांनी दिला आहे. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुमेध हातोले व सागर हातोले यांच्या मार्गदर्शनात अनिरुद्ध हा तोले, राज हातोले, विकास शेवलेकर, सौरव गोपनारायण, अनंता ठाकरे, वीरेंद्रकुमार लोधी, मिलिंद भोसले, मुकेश हातोले, अर्चना हातोले, रमा इंगोले, नीलिमा सरदार, संघमित्रा दाभाडे, काजल इंगळे, संजीवनी गवई, अंकिता हातोले, प्रवीणा दाभाडे, माधुरी इंगळे, स्वाती सदार यांच्यासह किसान विद्यालय येथील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या
By admin | Published: September 17, 2014 2:32 AM