खामगाव : शहरातील सेंट अँन्स इंग्शिल स्कूल व अकोला येथील सेंट अँन्स स्कूलची संयुक्त शैक्षणिक सहल चेन्नई येथे भयावह पूरस्थितीमुळे चेन्नईपासून ४0 किमी अंतरावरील तिरुवेल्लूर येथे अडकली होती. दरम्यान, ४ डिसेंबर रोजी पूर ओसरल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याने ही सहल परतीला निघाली असून, ५ डिसेंबर रोजी खामगाव येथे परतणार असल्याची माहिती मिळाली आहे. खामगाव येथील सेंट अँन्स इंग्लिश मीडिअम स्कूलचे २७ व अकोला येथील सेंट अँन्स स्कूलचे ३७ असे एकूण ६४ विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल २५ नोव्हेंबर रोजी केरळ येथे गेली होती. नियोजनानुसार ही सहल २ डिसेंबर रोजी चेन्नई येथून नवजीवन एक्स्प्रेसने निघून ३ डिसेंबर रोजी परतणार होती; मात्र चेन्नई येथे अतवृष्टी होत असल्याने रस्ते तसेच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने ही सहल चेन्नईपासून ४0 किमी अंतरावर असलेल्या तिरुवेल्लूर येथे अडकून होती. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात होती; मात्र सर्व विद्यार्थी सुखरुप असून, ही सहल ४ डिसेंबर रोजी परतीला निघाली असून, ५ डिसेंबर रोजी खामगाव येथे पोहोचणार आहे. रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने खासगी बस भाड्याने घेऊन सर्व विद्यार्थी व शिक्षक ४ डिसेंबर रोजी दुपारी ितरुवेल्लूर येथून निघाले आहेत. या बसमध्ये खामगावसोबतच अकोला येथील विद्यार्थीही प्रवास करीत असून, ही सहल ५ डिसेंबर रोजी सकाळी अकोला व त्यानंतर खामगाव येथे परतणार असल्याची माहिती सेंट अँन्स इंग्लिश स्कूलच्या सहलीसोबत असलेल्या शिक्षिका सुजाता उबाळे यांच्याकडून मिळाली आहे.
चेन्नईत अडकलेले विद्यार्थी परतीच्या मार्गावर
By admin | Published: December 05, 2015 9:08 AM