------------------------------------
नांदखेड-खिरपुरी बु. रस्त्याचे काम सुरू
बाळापूर : तालुक्यातील नांदखेड-खिरपुरी बु. रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याची मागणी होत होती. अखेर नांदखेड-खिरपुरी रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान, रस्त्याचे काम थातूरमातूर होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. (फोटो)
------------------------------------
तेल्हरा तालुक्यात कांद्याच्या क्षेत्रात वाढ
तेल्हारा : यंदा सततचा पाऊस झाल्यामुळे कुपनलिका व विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा तेल्हारा तालुक्यात कांदा पिकाचे क्षेत्र वाढले आहे. सध्या पेरणीचे कामे सुरू असून, शेतकरी कामात व्यस्त आहे.
--------------------------------
वाडेगाव परिसरात भुईमुगाच्या पेरणीला सुरुवात
वाडेगाव : परिसरातील टाकळी खु., खिरपुरी खु., व्याळा, कान्हेरी, देगाव शेतशिवारात भुईमुगाची पेरणी सुरू झाली आहे. यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाला पसंती देत पेरणी सुरू केली आहे.
----------------------------------
वांगेश्वर येथे पुलाचे काम संथ गतीने
तेल्हारा : तालुक्यातील वांगेश्वर येथील नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना वळण रस्त्याने जावे लागते. या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहे. त्यामुळे पुलाचे काम त्वरित करण्याची मागणी होत आहे.
--------------------------------
म्हातोडी परिसरात तूर सोंगणीला सुरुवात
म्हातोडी : परिसरातील घुसर, घुसरवाडी, खरप बु., कासली, दोनवाडा शिवारात तूर सोंगणीला सुरुवात झाली आहे. सध्या मजुरी वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली असून, एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन होत आहे.
-------------------------------
बार्शीटाकळी शहरात सार्वचनिक शौचलयांचा अभाव
बार्शीटाकळी : शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे ग्रामीण भागातून प्रवाशांची मोठ्या संख्येने ये-जा सुरू असते. दरम्यान, शहरातील बसस्थानक परिसरात व शहरातील काही भागात शौचलयांचा अभाव असल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
-------------------------------