अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर २००७ पासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी व अधिकाºयांना शासकीय सेवेत नियमित स्वरूपात घेण्याच्या शक्यता पडताळण्यासाठी शासनाने गठित केलेल्या अभ्यास समितीची व्याप्ती वाढली आहे. आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या समितीत आता अर्थ व प्रशासन सहसंचालक व आरोग्य सेवा संचालक या दोन अधिकाºयांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.‘एनएचएम’ अभियानांतर्गत असलेल्या विविध योजना राबविण्यासाठी आरोग्य विभागातील विविध आस्थापनांमध्ये राज्यभरात तब्बल २२ हजार अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. ‘समान काम-समान वेतन’ आणि विनाशर्त शासकीय सेवेत समायोजन या दोन प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ ही संघटना २०१२ पासून संघर्ष करीत आहे. संघटना करीत असलेल्या आंदोलनांची दखल घेत आता सार्वजनिक आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाºयांना शासन सेवेत नियमित स्वरूपात सामावून घेण्याबाबत विचार करण्याकरिता आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय अभ्यास समिती गठित केली आहे. यामध्ये कर्मचाºयांच्या संघटनेचे राज्याध्यक्ष आणि सचिव या दोघांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर सदर समितीत सदस्य सचिव म्हणून सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय, आरोग्य अभियान, मुंबई यांचा समावेश करण्यात आला. आता या समितीचा आणखी विस्तार करण्यात आला असून, त्यामध्ये अर्थ व प्रशासन सहसंचालक व आरोग्य सेवा संचालकांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाने ७ आॅगस्ट रोजी काढले आहे. सदर समिती कंत्राटी कर्मचाºयांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याबाबतच्या शक्यतांचा अभ्यास करीत आहे.पुढील महिन्यात होणार बैठककंत्राटी कर्मचाºयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या शक्यतांची चाचपणी करण्यासाठी गठित करण्यात आलेली ही समिती आपला अंतिम अहवाल शासनाला सोपविणार आहे. तत्पूर्वी ही समिती कंत्राटी कर्मचाºयांच्या राज्यपातळीवरील संघटनेसोबत चर्चा करणार आहे. पुढील महिन्यात संघटनेचे पदाधिकारी व समितीच्या सदस्यांची बैठक होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचारी; अभ्यास समितीची व्याप्ती वाढली
By atul.jaiswal | Published: August 10, 2017 6:35 PM
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर २००७ पासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी व अधिकाºयांना शासकीय सेवेत नियमित स्वरूपात घेण्याच्या शक्यता पडताळण्यासाठी शासनाने गठित केलेल्या अभ्यास समितीची व्याप्ती वाढली आहे. आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या समितीत आता अर्थ व प्रशासन ...
ठळक मुद्देअर्थ व प्रशासन सहसंचालक व आरोग्य सेवा संचालकांचा समावेश