आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोनवर संपर्क साधून कोरोना रूग्णांसाठी व्हेंटिलेटरची मागणी केली होती. याची दखल घेऊन आदित्य ठाकरे यांनी तत्काळ जिल्ह्याला पाच व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीत व्हेंटिलेटरचे वितरण करण्यात आले. त्यातील ३ व्हेंटिलेटर जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला व २ व्हेंटिलेटर उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, शहर ठाणेदार सचिन यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनोने व डॉ नेमाडे, जिल्हा परिषद गटनेते गोपाल दातकर, माजी जि.प.सदस्य अप्पू तिडके, बाजार समितीचे संचालक गजानन चौधरी, देवाशिष भटकर, शिवा गव्हाणे, प्रफुल्ल गावंडे, देशमुख, अजित तिडके, अक्षय लकडे, हेमंत कांबे आदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रूग्णालयाला मिळाले व्हेंटिलेटर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:15 AM