वाढती रुग्ण संख्या आणि अपुरे बेड आणि ऑक्सिजनची कमतरता यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशाने या रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे. पातूर शहरात डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय गेले अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या महाविद्यालयात शंभरहून अधिक बेडची क्षमता असून, त्याबरोबरच विस्तारित इमारतीचे बांधकाम झाले आहे. पातूर शहरात कोविड रुग्णालयासाठी बेड उपलब्ध झाले आहेत. रुग्णालयात निर्माण करायच्या मुलभूत आणि भौतिक सोयीसुविधा त्याबरोबरच पाणी, विज, जनरेटर, अग्निशमन दलाची गाडी आधी बाबींचा आढावा बाळापूर उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी घेतला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी वैद्यकीय सोयीसुविधांबाबत माहिती दिली. तसेच तहसीलदार दीपक बाजड यांनी, आयुर्वेद महाविद्यालयाचे व्यवस्थापक डॉ. साजिद शेख यांनी आराेग्य सुविधांबाबत माहिती दिली. यावेळी गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे उपस्थित होते.
फोटो:
रुग्णालयात स्थानिक रुग्णांना प्राधान्य द्यावे
पातूर येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये तालुक्यासह पातूर येथील स्थानिक रुग्णांना प्रथम प्राधान्य द्यावे. या ठिकाणीच त्यांना सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.