अकोला : भूमिगत गटार योजना व प्राप्त अनुदान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे, मनपा शाळांचे समायोजन,ह्यडीसी रूलह्णचा प्रस्ताव व महान जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीन बदलण्याच्या मुद्दय़ावर येत्या ३ जानेवारी रोजी मुंबईत निर्णय घेतला जाईल. याकरिता मनपाने सविस्तर प्रस्ताव तयार ठेवण्याचे निर्देश वजा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मनपा अधिकार्यांना केली. मंगळवारी स्थानिक विश्रामगृहावर पालक मंत्री डॉ. पाटील यांनी मनपा अधिकार्यांची आढावा बैठक घेत मनपाच्या रखडलेल्या मुद्दय़ावर विस्तृत चर्चा केली. अकोला शहरासाठी स्वतंत्र बांधकाम विकास नियमानुकूल नियमावली (डीसी रूल) लागू करण्यासह विविध प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मनपा अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत डीसी रूलचा नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले होते; परंतु अद्यापही प्रशासनाने प्रस्ताव सादर केला नाही. भूमिगत गटार योजनेसाठी शासनाकडून ५६ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. व्याजासह अनुदानाची रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांता्नत करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश डॉ. रणजित पाटील यांनी मनपा अधिकार्यांना दिले. थकीत वेतनाची समस्या गंभीर होत असताना, अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांचे तातडीने समायोजन करा, विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्यास शाळांचे समायोजन करण्याचे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी सुचित केले. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीन कालबाह्य झाल्याने त्यामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. पम्पिंग मशीनचा तिढा निकाली काढण्यासोबतच सुजल निर्मल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी सुधारणा कार्यक्रम राबवण्याच्या प्रस्तावावर मुंबईत सविस्तर चर्चा करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
रखडलेले प्रस्ताव सादर करा
By admin | Published: December 31, 2014 12:59 AM