अकोला, दि. २६- गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ात हमी दराने खरेदी करण्यात आलेली ज्वारी जिल्हय़ातील पाच शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून आहे. गोदामांमध्ये पडून ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित करण्याचा आदेश अद्याप शासनामार्फत देण्यात आला नाही. त्यामुळे गोदामातील हजारो क्विंटल ज्वारीला मोठय़ा प्रमाणात सोंडे लागले असून, पोखरलेल्या ज्वारीचे पीठ झाले आहे. याबाबत बुधवारी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत, शासकीय धान्य गोदामातील ज्वारी साठय़ाची चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारीच जिल्हा पुरवठा अधिकार्यांना (डीएसओ) दिले.गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सातही तालुक्यांत हमी दराने ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बाश्रीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर १ हजार ५७0 रुपये प्रतिक्विंटल दराने ज्वारी खरेदी करण्यात आली. जिल्हय़ातील पाच तालुक्यांत खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २0१५ मध्ये जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. दहा महिन्यांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश शासनामार्फत पुरवठा विभागाला अद्याप देण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांमधील ज्वारीमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाला असून, ज्वारीचे दाणे पोखरल्याने,हजारो क्विंटल ज्वारीचे पीठ झाले आहे. यासंदर्भात ह्यशासकीय धान्य गोदामां तील ज्वारीचे झाले पीठह्ण अशा आशयाचे वृत्त बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हय़ात ग तवर्षीच्या खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेली ज्वारी, शासकीय धान्य गोदामातील ज्वारीचा साठा, ज्वारीची सद्यस्थिती आणि गोदामातील ज्वारी शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासन आदेशासंबंधी शासनाकडे करण्यात आलेला पाठपुरावा याबाबत चौकशी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारीच जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांना दिले.
‘ज्वारी’चा अहवाल सादर करा!
By admin | Published: October 27, 2016 3:36 AM