अकोला : जिल्ह्यातील खदानींच्या ‘स्टोन क्रशर’ची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाºयांना १ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिला.अकोला तालुक्यातील येवता व बोरगाव मंजू येथील शासकीय जमिनीवरील खदानींची आणि ‘स्टोन क्रशर’ची तपासणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह संबंधित अधिकाºयांनी गत ३० आॅक्टोबर रोजी केली होती. त्यामध्ये ‘स्टोन क्रशर’वरून उडणाºया धुळीसंदर्भात क्रशरधारकांना कोणतीही तांत्रिक माहिती नसल्याचे आढळून आले. त्यानुषंगाने जिल्ह्यात किती स्टोन क्रशरवर धूळ नियंत्रक यंत्रणा कार्यन्वित आहे, स्टोन क्रशरमधून निघणारी धूळ आणि त्यामुळे आढळून येणारी प्रदूषणाची पातळी यासंदर्भात ‘स्टोन क्रशर’ची तपासणी करून अहवाल तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अकोला येथील उपप्रादेशिक अधिकाºयांना १ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिला.