बुलडाणा : नाशिक येथे १४ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत भारत विद्यालयाचा संघ सहभागी झाला होता. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्या आदित्य देवल, अनिकेत परिहार व सुमीत गवई हे महाराष्ट्र संघ निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्राचा संघ नाशिक येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. यावर्षी भारत विद्यालयाच्या १४ वर्षांखालील संघाबरोबरच १९ वर्षांखालील क्रिकेट संघदेखील राज्यस्तरावर पोहोचला. निवडचाचणीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, मुख्याध्यापक विलासराव देशमुख, उपमुख्याध्यापक शालीकराम उन्हाळे, पर्यवेक्षक रामभाऊ पालवे, क्रीडाधिकारी गणेश जाधव व चंद्रकांत साळुंके, संघाचे प्रशिक्षक संजय देवल, वैभव वाघमारे आदींनी मार्गदर्शन केले.
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंचे यश
By admin | Published: January 29, 2015 1:10 AM