लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: शेतकरी चळवळीला पाठिंबा म्हणून मूर्तिजापूर येथे मंगळवार ६ जून रोजी बाजार बंद करण्यात आला. या आंदोलनात दूध व कांदे रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला.या आंदोलनास शेतकरी, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांनी स्वत:चे व्यवसाय बंद करून आंदोलनात भाग घेतला. या प्रसंगी अनेकांची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन शेतकरी कामगार पक्षाचे विजय गावंडे यांनी केले. प्रगती शेतकरी संघटनेचे राजूभाऊ वानखडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शिवसेनेचे विनायक गुल्हाने, शरद भटकर, अप्पू तिडके आणि शेतकरी संघटनेचे विजय लोडम, बाळासाहेब तायडे, गुरुदेव सेवा मंडळाचे माधव काळे, कापूस उत्पादक संघाचे रमेशभाऊ देशमुख, प्रगती शेतकरी संघटनेचे देवीदास बांगड, ग्राहक मंचाचे प्रकाशसिंग राजपूत, जीवन ढोकणे, सेवकराम लहाने व प्रा. सुधाकर गौरखेडे (जनमंच) यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुणभाऊ बोर्डे, सेवकराम लहाने, शरद बंग, नीलेश मालधुरे, स्वप्निल देशुमख, कैलास साबळे, नितीन गावंडे, सागर ढोरे, मुन्ना नाईकनवरे, गोपाल तायडे, प्रदीप तायडे, मंगेश बेलसरे, प्रफुल्ल मालधुरे, देवानंद डहाके इत्यादींनी परिश्रम घेतले. अशरफभाई, खलीलभाई, फारुखभाई, माणिकराव खरबडकार, शेरखा तजमुलखा, तस्लीम खा, विनोद उमाळे, सुधाकर टाक, गोविंद नगरे, मुन्ना दुबे, संदीप बोळे या व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करून आंदोलनात भाग घेतला.
मूर्तिजापुरात शेतकऱ्यांचे आठवडी बाजार बंद आंदोलन यशस्वी
By admin | Published: June 06, 2017 7:53 PM