अकोला : सुकोडा येथील श्रीकृष्ण काशीराम खाडे (६०) या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. श्रीकृष्ण खाडे यांच्यावर बँकेचे कर्ज होते. कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. कर्जमाफीची केवळ घोषणाच झाली. प्रत्यक्षात लाभ मिळत नसल्याने तसेच पेरणी केल्यानंतरही पावसाने दडी मारल्याने आर्थिक संकट अधिकच गडद झाले. त्यामुळे दोन्ही गोष्टींमुळे वैतागलेल्या श्रीकृष्ण खाडे यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी दिली. वडील घरी न आल्यामुळे मुलाने त्यांचा शोध घेण्यासाठी स्वत:चे शेत गाठले. शेतातील झोपडीमध्ये वडील खाटीवर झोपलेले दिसून आले.
सुकोडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: July 13, 2017 1:38 AM