अकोला : राज्यात सध्या गरजेपेक्षा अधिक वीज उपलब्ध असतानाही शेतकºयांच्या कृषी पंपांना मात्र रात्री वीज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. त्यामुळे कृषी पंपांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.राज्यात सध्या वीज उत्पादनाची स्थिती सुधारली आहे. मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर झाल्यामुळे राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. खुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे कबूल केले आहे. राज्यात जर पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असेल, तर शेतकºयांच्या कृषी पंपांना आठवडाभर दिवसाच वीज पुरवठा का केला जात नाही, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित होत आहे.अकोला जिल्ह्याकडे यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी सिंचनाचा आधार घेत आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकºयांना रात्री १० तास तर दिवसा आठ तास, असा वीज पुरवठा केला जातो. यातील चार दिवस रात्री तर तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक आहे. हे वेळापत्रक सतत बदलत राहते. रात्रीच्या वेळी सिंचन करताना शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा धोका कायम शेतकºयांच्या मानगुटीवर राहतो. त्यामुळे शेतकºयांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
वेळापत्रक वीज नियामक आयोगाच्या निकषांनुसारयासंदर्भात महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता, कृषी पंपांसाठी वीज पुरवठ्याचे निकष महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिला आहे. या निकषानुसार कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो, असे अधिकाºयांनी सांगितले.