लोहारा (जि. अकोला), दि. ९- येथील इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ मार्च रोजी दुपारी घडली. लोहारा येथील सुनीता अरुण मोरे या विद्यार्थिनीने गुरुवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ती नया अंदुरा येथील जिजामाता विद्यालयात वर्ग अकरावीत शिक्षण घेत होती. आई-वडील शेतात गेल्यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेतला. आई-वडील सायंकाळी घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी अरूणा मोरे यांच्या फियार्दी वरू न उरळ पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोन्लीस उपनिरीक्षक साठवले करीत आहेत. आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही. सुनीता अभ्यासात हूशार होती. दरम्यान, बाळापूर तालुक्यातील मुलींच्या आत्महत्तेची सलग दुसरी घटना आहे. बुधवारीबाळापूर येथील एका दहाव्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीने ८ मार्च रोजी मानसिक तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.
अकरावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: March 10, 2017 2:41 AM