शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By admin | Published: December 15, 2015 1:56 AM

नापिकीस व कर्जबाजारीपणास कंटाळून वीष प्राशन करून केली आत्महत्या.

उरळ (अकोला): हसनापूर येथील ७0 वर्षीय शेतकर्‍याने नापिकीस व कर्जबाजारीपणास कंटाळून सोमवारी शेतात वीष प्राशन करून आत्महत्या केली. हसनापूर येथील शेतकरी वासुदेव अर्जुन राऊत यांनी सोमवारी सकाळी ६.३0 वाजता हसनापूर शिवारातील शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या शेतात यावर्षी कपाशीचे पीक पेरले होते. पेरणीसाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उरळ शाखेचे ४0 हजार रुपयांचे पीक कर्ज त्यांनी घेतले होते. कपाशीला पाणी देण्यासाठी विंधन विहीर खोदण्याकरिताही बँकेचे कर्ज घेतले. परंतु, खोदलेल्या विंधन विहिरीस पाणी लागले नाही. परिणामी, कपाशीचे पीक सुकले. या नापिकीने व कर्जबाजारीपणाने हताश होऊन वासुदेव राऊत यांनी विष प्राशन केले. या घटनेबाबत मृतकाचे नातेवाईक संतोष पांडुरंग राऊत यांनी उरळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. उरळ पोलीस स्टेशनचे जमादार दादाराव लिखार व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोरे हे मृतदेह घेऊन उत्तरीय तपासणीसाठी अकोल्यास रवाना झाले आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार पी.के. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.