अकोला : मायक्रो फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांच्या पठाणी वसुलीला कंटाळून निंभोरा येथील शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अल्पभूधारक शेतकरी किशोर ताथोड यांनी घर बांधकामासाठी तसेच किराणा दुकानासाठी विस्तार फायनान्सचे सोनटक्के व अस्पायर फायनान्सचे नागेश शिरसाट आणि अनिल गाठेकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची त्यांनी नियमित परतफेडही केली; त्यांच्याकडे केवळ २० हजार रुपये थकीत होते. यासाठी तीन महिन्यांचा अवधी असल्याने ताथोड यांनी फायनान्स कं पनीच्या अधिकाºयांची भेट घेऊन ८ दिवसांत उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासनही दिले; मात्र ३० जुलै रोजी सायंकाळी किशोर ताथोड घरी नसताना सोनटक्के व नागेश शिरसाट आणि अनिल गाठे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी किशोर यांची पत्नी सविता ताथोड यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली होती.
कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:01 AM