बोरगाव मंजू (अकोला ): नापिकी व कर्जाला कंटाळून अकोला तालुक्यातील निपाणा येथील तरुण शेतकºयाने स्वत:च्या शेतातील विहीरीत असलेल्या लोखंड अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार, २१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. गजानन महादेव राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे.बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजानन राऊत यांच्या कडे शेती असून ते कुटुंब प्रमुख आहेत. दोन चिमुकली मुले, पत्नी, आई असा परिवार असून, यावर्षी त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली. गत अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकाची वाढ खुंटली. शनिवारी पाऊस पडल्यानंतर रविवारी सकाळी शेतातील पिक पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून गजानन राऊत घरून निघाले. सकाळपासून गेलेले गजानन राऊत घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी त्यांना पाहण्यासाठी शेतात गेली. तेथे विहिरीत त्यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला. गावात वार्ता पसरताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. दरम्यान, बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. गजानन राऊत यांच्यावर बँकेचे कर्ज असून, पिक परिस्थितीमुळे ते विवंचनेत होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. ठाणेदार हरिश गवळी पुढील तपास करीत आहेत.
तरुण शेतकऱ्याची विहिरीतील अँगलला गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:27 PM
निपाणा येथील तरुण शेतकºयाने स्वत:च्या शेतातील विहीरीत असलेल्या लोखंड अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार, २१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
ठळक मुद्दे गजानन महादेव राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. रविवारी सकाळी शेतातील पिक पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून गजानन राऊत घरून निघाले.विहिरीत त्यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला.