शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

आदिवासी शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 6:04 PM

तुळशीराम नामदेव शिंदे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.

आलेगाव (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून ६२ वर्षीय वृद्ध शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना पिंपरडोळी येथे १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. विशेष म्हणजे सात दिवसांपासून सदर शेतकºयाचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. तुळशीराम नामदेव शिंदे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.यावर्षी परतीच्या पावसाने शेतकºयाच्या तोंडातील घास पळवला. पावसामुळे हातात आलेले पीक गेले. त्यामुळे, पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथील तुळशीराम नामदेव शिंदे यांच्याकडे ४ एकर शेतात सोयाबीनचे पिक होते. परंतु सततच्या पावसामुळे त्यांना सोयाबीन सोंगता सुध्दा आले नाही. त्यामुळे पेरणीचा खर्च सुध्दा निघाला नाही. परिणामी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यात बँकेच्या कर्जाचे ओझे सुध्दा होते. या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केली. १३ नोव्हेंबर रोजी तुळशीराम शिंदे कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. १९ नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र आलेगांव अंतर्गत येत असलेल्या नवेगाव वनविभागाच्या जंगलामध्ये निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच आलेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे,पद्माकर पातोंड ,दादाराव आढाव ,सुनील भाकरे हे घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी पंचनामा करुन सात दिवसापासून झाडाला लटकलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे.(वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरfarmer suicideशेतकरी आत्महत्या