ठळक मुद्देसुकळी येथील घटनामृतकाचे नाव : धम्मा शंकर अंभोरे
लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री : नजीकच्या सुकळी येथील शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३0 सप्टेंबर रोजीच्या सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.पातुर तालुक्यातील सुकळी येथील धम्मा शंकर अंभोरे (४0) असे मृतकाचे नाव आहे. मृतकाचे वडील शंकर अंभोरे यांच्याजवळ तीन एकर शेती असून, सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर बँक व सावकाराचे कर्ज थकीत झाले होते. त्यामुळे धम्मा अंभोरे यांनी जीवन यात्रा संपविण्याचा निर्णय घेऊन सुकळी शेतशिवारातील गावाच्या नाल्याजवळ देवकाबाई पांडुरग वांडे यांच्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आ त्महत्या केली . मृतकाच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन लहान मुली, दोन मुल असा आप्त परिवार आहे.