शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

‘सवरेपचार’मध्ये ‘ऑक्सिजन’चा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:01 AM

अकोला : ऑक्सिजनचा ऐनवेळी तुटवडा भासून, रुग्णांवर गंभीर प्रसंग ओढवू नये, म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेशा साठा ठेवला जातो. सर्व कक्ष मिळून येथे दररोज ४0 ते ५0 सिलिंडर तर महिन्याला सुमारे १२00 ते १५00  सिलिंडरची आवश्यकता असून, ती पूर्ण केली जाते, अशी माहिती ‘सवरेपचार’ रुग्णालय प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका नाही दररोज पुरेशा प्रमाणात पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऑक्सिजनचा ऐनवेळी तुटवडा भासून, रुग्णांवर गंभीर प्रसंग ओढवू नये, म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेशा साठा ठेवला जातो. सर्व कक्ष मिळून येथे दररोज ४0 ते ५0 सिलिंडर तर महिन्याला सुमारे १२00 ते १५00  सिलिंडरची आवश्यकता असून, ती पूर्ण केली जाते, अशी माहिती ‘सवरेपचार’ रुग्णालय प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठय़ाअभावी जवळपास ६३ बालकांना जीव गमवावा लागला. या पृष्ठभूमीवर पश्‍चिम वर्‍हाडाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार  रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला असता, येथे सिलिंडर पुरेसे असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील सर्वच कक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात येतात.

महिन्याला १२00 ते १५00 सिलिंडरची आवश्यकतारुग्णालयाला दररोज साधारणपणे ४0 ते ५0 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. यामध्ये अतिदक्षता (आयसीयू) विभागामध्ये  ७ क्यूबिक एमएमचे सरासरी १५ ते २0  सिलिंडर लागतात. व्हेंटिलेटर लावले, तर हा आकडा ४0 पर्यंत जातो. बालरोग विभागातील नवजात शिशू उपचार युनिटमध्ये दररोज ७ ते १२ जम्बो सिलिंडरची गरज भासते. मुख्य शल्यक्रिया गृह (ऑपरेशन थिएटर) मध्ये आठवड्याला १0 ते १५ सिलिंडर लागतात. अशाप्रकारे रुग्णालयाची महिन्याची गरज साधारपणे १२00 ते १५00 सिलिंडरची आहे.

‘ऑक्सिजन’चे कंत्राट औरंगाबादच्या कंपनीला रुग्णालयाला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी रुग्णालयाच्यावतीने निविदा प्रक्रिया राबवून ठेका देण्यात आलेला आहे. वर्षभरासाठी हा ठेका असून, दरवर्षी यासाठी निविदा काढल्या जातात. त्यानुसार संबंधित ठेकेदार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करतो. सध्या औरंगाबाद येथील सागर गॅसेस या कंपनीला सिलिंडर पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले असून, या कंपनीला वेळच्या वेळी देयक अदा करण्यात येत असल्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा अव्याहतपणे होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

‘सवरेपचार’ रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा मुळीच तुटवडा नाही. कंत्राट दिलेल्या कंपनीला वेळावेळी देयक दिले जात असल्यामुळे त्यांच्याकडून ऑक्सिजन सिलिंडरचा व्यवस्थित पुरवठा होत आहे. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.