अकोला : गत दोन-तीन दिवसांपासून नवताप सुरू झाला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली असून शेती मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. उन्हात मशागतीची कामे करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
हरभऱ्याला ४९०० रुपये दर
अकोला : मान्सूनच्या तोंडावर बाजार समितीत हरभऱ्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी हरभऱ्याला जास्तीत जास्त ४९०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर कमीत कमी ४१००, सर्वसाधारण ४६०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.
डिझेलच्या दरात ३० टक्के वाढ
अकोला : डिझेल-पेट्रोलच्या दरात भडका उडत असून, वर्षभरात डिझेलच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात डिझेलचा दर ७०.०५ रुपये लिटर होता. तो आता ९० रुपये लिटर पर्यंत पोहोचला आहे.
मे महिन्यात लग्नाचा मुहूर्त हुकला!
अकोला : यंदाच्या उन्हाळ्यातही कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लावले. त्यामुळे अनेक लग्नसोहळे लॉकडाऊन झाले. १४ मुहूर्त असलेल्या मे महिन्यातही लग्न सोहळे टाळण्यात आले.