ठळक मुद्देमे महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे.तीन दिवसांपासून हेच कमाल तापमान ४४.९ अंश होते.
अकोला : अकोल्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, सोमवार, ५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता हे तापमान ४४.९ अंशावर पोहोचले. उन्हाचा कडाका वाढला आहे.गतवर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत परतीचा पाऊस होता. त्यानंतरही पाऊस सुरूच आहे. सतत ढगाळ वातावरण राहत असल्याने एप्रिल महिन्यात अपेक्षित ऊन वाढले नाही; परंतु मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे; पण पूर्व मान्सून आणि रोहिणी नक्षत्रापासून पाऊस सुरू झाल्यास तापमान कमी होईल. यावर्षी पाऊस चांगला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, याही परिस्थितीत अकोल्याचे कमाल तापमान ४४.९ अंश होते. तीन दिवसांपासून हेच कमाल तापमान ४४.९ अंश होते.