अकोला: गेल्या अनेक महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामध्ये दलालांचा मुक्त संचार वाढला आहे. रुग्णालयावर त्यांनी कब्जाच केल्याचे एकंदर चित्र दिसून येते. गुरुवारी ह्यलोकमतह्णने सर्वोपचार रुग्णालयात वावरणार्या दलालांचे ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण केले. यादरम्यान दलाल राजरोसपणे रुग्णालयातील विविध विभागांमध्ये वावरताना दिसून आले. अनेकदा पोलिसांत तक्रार केल्यानंतरही दलालांवर काहीही परिणाम झालेला नाही. नोकरदार, विद्यार्थी यांसोबतच सामान्य नागरिकांची दलालांच्या माध्यमातून मोठी आर्थिक लुबाडणूक होत आहे. या दलालांविरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी अनेकदा पोलिसांत तक्रार केली; परंतु पोलीस दलालांना पकडून तात्पुरती प्रतिबंधात्मक कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी दलाल सर्वोपचार रुग्णालयात पुन्हा सक्रिय होतात. नागरिकांना वैद्यकीय परिपूर्ती देयक, शारीरिक क्षमता प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र आदींची गरज असते. त्यासाठी सर्वोपचार रुग्णालयामध्ये ते येतात. ही प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी याच परिसरात सक्रिय असलेले दलाल त्यांना हेरतात. त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे सांगत हजारो रुपये हे दलाल त्यांच्याकडून उकळतात. नागरिकही काम लवकर व्हावे म्हणून या दलालांच्या आमिषाला बळी पडतात. येथील अनेक कर्मचार्यांसोबत या दलालांचे लागेबांधे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून फिटनेस प्रमाणपत्र व वैद्यकीय परिपूर्ती देयकाची कामे होतात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अंपगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते; परंतु हे दलाल नागरिकांना या कार्यालयापर्यंंतच पोहोचूच देत नाहीत. त्यांची गरज ते बाहेरच भागविण्याचा प्रयत्न करतात. पैसे घेऊनही अनेकदा नागरिकांना प्रमाणपत्रे मिळत नाहीत. पैसे जातात आणि कामही होत नाही. यामुळे अनेक जण अधिष्ठातांकडे तक्रारी करतात.
सर्वोपचार रुग्णालयावर दलालांचा कब्जा
By admin | Published: June 10, 2016 2:18 AM