दोन्ही रेशन दुकानदारांना ग्राहकांनी धान्याची माहिती विचारल्यास, दुकानदारांकडून शिवीगाळ करून ग्राहकांना धमक्या देण्यात येतात. दुकानात रेट बोर्ड लावण्यात आलेले नाही. अशी तक्रार बांबर्डा येथील रेशन कार्डधारकांनी अकोट येथील तहसीलदार व पुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत ३१ मे रोजी पुरवठा विभागाचे निरीक्षक गौरव राजपूत यांनी बांबर्डा येथील गावात येऊन ग्रामपंचायत कार्यालयात रेशन कार्डधारकांचे जबाब नोंदविले. याप्रकरणी २५ रेशन कार्डधारकांच्या रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच काही रेशन कार्डधारकांकडून नवीन रेशन कार्ड बनविण्यासाठी ४ हजार रुपये घेतले. गावातील नागरिकांनी पुरवठा विभागाकडे तक्रार केल्यामुळे कुटासा येथील विनोद डाबेराव यांनी नागरिकांना धमकी दिली होती. याप्रकरणी बांबर्डा येथील नागरिकांनी दहिहंडा पोलीस स्टेशनला ३१ मे रोजी स्वस्त धान्य दुकानदार संगीता पंजाब शिरसाठ व कुटासा येथील विनोद डाबेराव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. बांबर्डा येथील रेशन दुकानदार मनमानी करीत असून, माझे कोणीच काही करू शकत नाही, अशी धमकी गावातील रेशन कार्डधारकांना देत आहे. त्यामुळे बांबर्डा येथील रेशन दुकानाचा परवाना त्वरित रद्द करावा, अशी मागणी गावातील रेशन कार्डधारकांनी केली आहे.
फोटो:
बांबर्डा येथील स्वस्त धान्य दुकानाची तालुका पुरवठा निरीक्षकांनी तपासणी केली. तपासणीदरम्यान रेशन दुकान बंद आढळले. अहवाल आल्यानंतरच रेशन दुकानाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.
-नीलेश मडके, तहसीलदार अकोट
बांबर्डा येथील येथील ग्राहकांनी रेशन दुकानाबाबत तहसीलदार व पुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. २५ रेशन कार्डधारकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे चौकशी करून दोन दिवसांत याबाबत अहवाल तहसीलदारांकडे सादर करण्यात येईल.
-गौरव राजपूत, पुरवठा निरीक्षक अकोट