शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 2:06 PM

हळद, मिरची पावडरच्या नमुन्यात लाकडी भुसा असल्याचे दिसून आले. मिरची पावडर मटकी, चवळीमध्ये टाकल्यास त्याचा रंग काळाकुट्ट होतो.

अकोला: जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये गेल्या काही दिवसात पुरवठा झालेले कच्चे धान्य, इतर साहित्य निकृष्ट असल्याचे नमुने थेट जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद यांच्याकडे आणण्यात आले. त्यानंतरही चौकशी किंवा तपासणी न झाल्याने सोमवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबारात तक्रार करण्यात आली. या प्रकरणात पुरवठादारांशी काही अधिकाऱ्यांचे संगनमत असू शकते, त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या शोभा शेळके यांनी केली आहे.पावसाळ्यात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. बालमृत्यूची संख्याही प्रचंड वाढते. आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागासाठी बालमृत्यू आव्हानात्मक ठरतात. राज्यातील कुपोषित बालकांची ही संख्या गृहीत धरून त्यांच्यासाठी पोषण आहार पुरवठा केला जातो; मात्र त्या पुरवठा प्रक्रियेलाच कीड लागलेली आहे. बालकांचा आहार त्यांच्यापर्यंत ठरलेल्या वेळापत्रकानुसार न पोहचणे, पुरवठादारांकडून ठरलेल्या गुणवत्तेचा आहार न मिळणे, यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. कुपोषणग्रस्ततेचा डाग पुसून माता-बालमृत्यू रोखणे, बालकांना सुदृढ आरोग्याची हमी देण्यासाठी शासनाकडून राबवल्या जाणारा पोषण आहार पुरवठा योजनेचा सातत्याने बट्ट्याबोळ केला जात आहे. हा प्रकार माजी सदस्य शोभा शेळके यांनी अनेक अंगणवाड्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन उघडकीस आणला. त्याचे नमुनेही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या समक्ष शुक्रवारी सादर केले. त्यापैकी हळद, मिरची पावडरच्या नमुन्यात लाकडी भुसा असल्याचे दिसून आले. मिरची पावडर मटकी, चवळीमध्ये टाकल्यास त्याचा रंग काळाकुट्ट होतो. पुरवठादाराकडून सुरू असलेल्या कच्च्या धान्याचा पुरवठा निकृष्ट आहे. भेसळयुक्त वस्तूंमुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही याप्रकरणी कोणतीही चौकशी झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संगनमत करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शेळके यांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.

कच्च्या धान्यासाठी ६,३०० कोटींचा खर्चगरोदर, स्तनदा माता, बालकांच्या आरोग्यासाठी पोषण आहार पुरवठ्यावर महिला व बालकल्याण व विभागाकडून वर्षभरात ६,३०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्च होत असताना राज्यातील ७८ हजारांपेक्षाही अधिक मुलांचे बालपण कुपोषणाने करपल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद