शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आश्चर्य आहे, अवघ्या चाेवीस तासांत निर्माण झाली कचरा साठवणुकीची समस्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:14 AM

मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच आयुक्त निमा अराेरा यांनी नियमबाह्य कामांना कदापि थारा दिला जाणार नसल्याचे सांगत पुढील वाटचाल ...

मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच आयुक्त निमा अराेरा यांनी नियमबाह्य कामांना कदापि थारा दिला जाणार नसल्याचे सांगत पुढील वाटचाल स्पष्ट केली हाेती. मागील चार वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडवर कचरा बाजूला सारण्याचे काम करणाऱ्या पाेकलेन मशीनच्या माेबदल्यात महापालिकेने ४ काेटींपेक्षा अधिक किमतीचे देयक अदा केले. अर्थात, मनपाच्या तिजाेरीची दिवसाढवळ्या लूट हाेत असल्याची बाब आयुक्त अराेरा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही मशीन बंद करून मनपाच्या मालकीची मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या सर्व बाबी महापालिकेच्या हिताच्या असल्या तरी त्याआडून दुकानदारी करणारे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांना हाताशी धरून बुधवारी डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याची ओरड करीत आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी धाव घेतली.

मशीनमध्ये अचानक बिघाड?

डम्पिंग ग्राउंडवरील एक पाेकलेन मशीन आयुक्तांनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परभणी येथील कंत्राटदाराच्या दुसऱ्या मशीनद्वारे कचरा बाजूला सारण्याचे काम सुरू करण्यात आले. दाेन दिवसांपूर्वी या पर्यायी मशीनमध्ये अचानक बिघाड झाल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम बंद पडले. हा दुग्धशर्करा याेग अचानक कसा जुळून आला, हे न समजण्याइतपत अकाेलेकर नक्कीच दूधखुळे नाहीत.

पडद्यामागील सूत्रधार काेण?

मागील काही दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या विलगीकरणाची जबाबदारी मे. परभणी अग्राेटेक प्रा. लि. कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीने कचऱ्याचे विलगीकरण केल्यानंतर त्याची पुढे कशी विल्हेवाट लावली, याबद्दल अनभिज्ञता असताना कंपनीच्या देयकासाठी कर्तव्यदक्षतेचा आव आणणाऱ्या एका स्थानिक अधिकाऱ्याने आयुक्तांकडे रेटा लावला. त्या देयकाला आयुक्तांनी बाजूला सारल्यानंतर अचानक कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे प्रशासनाला अस्थिर करणारा पडद्यामागील सूत्रधार काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.