लोकमत न्यूज नेटवर्कचोंढी : गारपीटमुळे चोंढी, अंधारसांगवी, चारमोळी, पांढुर्णा परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून सर्वेक्षण करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना दिले आहेत. चोंढी परिसरात कृषी सहायकाने दांडी मारल्याने १३ फेब्रुवारी रोजी नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षणच होऊ शकले नाही. त्यामुळे या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. पातूर तालुक्यातील चोंढी, चारमोळी, अंधारसांगवी, पांढुर्णा आदी गावांमध्ये ११ फेब्रुवारी रोजी गारपीट झाल्याने शेतकर्यांचे गहू, हरभरा, कांदा या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाची पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश कृषी मंत्री फुंडकर यांनी दिले. त्यावरून तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना १३ फेब्रुवारीला शेतीची पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक हे चोंढी परिसरातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोहोचले; परंतु कृषी सहायक शेळके हे चक्क गैरहजर राहिले. त्यामुळे घटनास्थळी शेतीची पाहणी करायला आलेले तलाठी खंडारे, हेडाऊ व ग्रामसेवक कापकर यांनी कृषी सहायक शेळके हे गैरहजर असल्यामुळे शेतीचा सर्व्हे करण्याचे रद्द केले. त्यामुळे मदतीची आस असलेल्या चोंढी, चारमोळी, पांढुर्णा येथील शेतकर्यांची कृषी सहायकांच्या बेजबाबदारपणे निराशा झाली.त्यामुळे शेतकर्यांना मदतीपासून वंचित ठेवणार्या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी कृषी सहायक आर.आर.शेळके यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोबदला मिळवून देऊ - हरीश पिंपळेमूर्तिजापूर तालुक्यात ११ फेब्रुवारी रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. शासनाच्या दरबारात पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोबदला मिळवून देऊ, असे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर देताना बोलत होते.४मूर्तिजापूर मतदारसंघातील काही परिसरात शेतकर्यांचे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळवर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. संबंधित विभागाला तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ४कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी ताबडतोब प्रत्येक नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणीसोबत पंचनामा करणार आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले आहे. शेतकर्यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे, असेही पिंपळे म्हणाले.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोबदला मिळवून देऊ - हरीश पिंपळेमूर्तिजापूर तालुक्यात ११ फेब्रुवारी रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. शासनाच्या दरबारात पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोबदला मिळवून देऊ, असे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर देताना बोलत होते.मूर्तिजापूर मतदारसंघातील काही परिसरात शेतकर्यांचे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळवर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. संबंधित विभागाला तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी ताबडतोब प्रत्येक नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणीसोबत पंचनामा करणार आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले आहे. शेतकर्यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे, असेही पिंपळे म्हणाले.