शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

पीक नुकसानीचा सर्वे करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:18 AM

दुकानाला आग; आ.शर्मा यांची पाहणी अकाेला: गौरक्षण रोड येथील सहकार नगर चौकातील शिवगंगा इलेक्ट्रॉनिक्सला अचानक आग लागली. या आगीत ...

दुकानाला आग; आ.शर्मा यांची पाहणी

अकाेला: गौरक्षण रोड येथील सहकार नगर चौकातील शिवगंगा इलेक्ट्रॉनिक्सला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य बेचीराख झाले असून शनिवारी आमदार गाेवर्धन शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त रवी सावके यांना मदतीचा हात दिला. यावेळी बाल कल्याण सभापती मनिषा भंसाली ,श्रीराम सेवा समितीचे अध्यक्ष विलास अनासने, नगरसेवक विजय इंगळे, नगरसेवक बाल टाले,रविंद्र भंसाली उपस्थित हाेते.

रेल्वे क्वाॅर्टर परिसरात चाेरट्यांचा सुळसुळाट

अकाेला: अकाेटफैल भागात रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधली हाेती. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यांचे बस्तान हलविल्यामुळे रेल्वे क्वाॅर्टर बेवारस स्थितीत आहेत. रात्री अपरात्री या परिसरात असामाजिक तत्वांना ऊत येत असल्याने स्थानिक रहिवासी वैतागले आहेत. तसेच भुरट्या चाेरट्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांनी पाेलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

जिल्हाकचेरीत नियम पायदळी

अकाेला: काेराेनाच्या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाने साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांसह खुद्द काही अधिकारी व कर्मचारी काेराेना नियम पायदळी तुडवित असल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्हावासियांवर कारवाइचा बडगा उगारणाऱ्या जिल्हाप्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी हाेत आहे.

जिल्हा परिषदेत स्वच्छतागृहाचा अभाव

अकाेला:जिल्हा परिषदेच्या विविध विभागात प्रलंबित कामे निकाली काढण्याच्या उद्देशातून ग्रामीण भागातील नागरिक दाखल हाेतात. यामध्ये महिला व पुरूषांचा समावेश राहताे. जिल्हा परिषदेच्या आवारात महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबणा हाेत आहे. याविषयाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

माेकाट कुत्र्यांची संख्या वाढली!

अकाेला: शहरात माेकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचा सुळसुळाट झाला आहे. जुने शहरातील भांडपूरा चाैक, गुलजारपुरा चाैक,दगडी पुल, कमला वाशिम बायपास चाैक, उमरी, माेहम्मद अली चाैकातील मच्छी मार्केट आदी उघड्यावर मांस विक्रीच्या ठिकाणी माेकाट कुत्र्यांच्या झुंडी आढळून येतात. अशा भटक्या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी प्रभाग ४ मधील उमरीवासीयांनी केली आहे.

नाली बुजवली;रस्त्यावर सांडपाणी

अकाेला: टाॅवर चाैक ते रतनलाल प्लाॅट मार्गावरील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानसमाेर मुख्य नाली बुजविण्यात आल्यामुळे परिसरातील हाॅस्पीटल, इमारतींमधील सांडपाणी रस्त्यात साचत असल्याचे चित्र आहे. प्रभागाचे नगरसेवक व मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप स्थानिकांनी केला आहे.

लसीकरणासाठी पुढाकार घ्या!

अकाेला: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ६० वर्षांवरील वयाेवृध्द नागरिक व गंभीर स्वरूपाच्या व्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठी लसीकरण माेहीम राबवली जात आहे. या लसीकरण माेहीमेसाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

बाजारपेठेत गर्दी; नियम पायदळी

अकाेला: शहरात काेराेनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे दिसत आहे. अशास्थितीतही शनिवारी बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष हाेत असल्याने संसर्गाचा धाेका वाढला आहे.

पथकांचे रेस्टाॅरन्टकडे दुर्लक्ष

अकाेला: जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत दुकाने खुली करण्याची परवानगी दिली. तसेच हाॅटेल, रेस्टाॅरंट, खानावळी चालकांना रात्री ९ पर्यंत पार्सल सुविधा देण्याचे निर्देश आहेत. तरीही काही खानावळी, रेस्टाॅरंटमध्ये नियम बाजूला सारत आतमध्ये ग्राहकांना जेवण दिले जात आहे. याकडे मनपाने गठीत केलेल्या पथकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत आहे.