अकोला: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी रविवारी शहरातील आगरकर विद्यालयाला भेट देऊन जागेची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहाण यांची उपस्थित होती.मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यात वसतिगृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सर्व सुविधायुक्त हे वसतिगृह राहणार आहे. त्यामुळे प्रमुख शहरात राहून शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. अकोला शहरातही मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्याकरीता रविवारी सकाळी पालकमंत्री यांनी आगरकर विद्यालयाच्या परिसराला भेट देऊन जागेची पाहणी केली.