अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीला आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना होताच जुने शहर पोलिसांनी मंगळवारी फसवणूक करणाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.गोपाल अग्रवाल मध्यवर्ती बस स्थानकासमोर विविध प्रकाशित वृत्तपत्रे विक्री करून कुटुंबाचे पालनपोषण करतात. याला जोड म्हणून त्यांनी मागील वर्षी मित्रांसोबत ठोक्याने शेती केली होती. त्यामध्ये आलेले तुरीचे पीक मित्रांनी परस्पर विक्री केले. त्याद्वारे आलेली रक्कम नियमानुसार गोपाल अग्रवाल यांना न देता हडप केली. ती रक्कम मागणी केली असता, पूर्वीच्या मित्रांनी स्थानिक गुंडांच्या मदतीने घरी येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामध्ये सुनील श्रीराम ठाकरे आणि मंगेश धोटे या दोघांनी अग्रवाल यांची फसवणूक केली होती. त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावर जुने शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हिरासिंग आडे यांनी थातूरमातूर चौकशी करीत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार दिली; परंतु चौकशी झाली नाही; मात्र न्याय न मिळाल्याने १५ आॅगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्याचे पत्र लिहून गोपाल अग्रवाल यांचे कुटुंबीय रविवारी दिल्लीला रवाणा झाले; मात्र त्यांनी आत्मदहन करण्यापूर्वीच जुने शहर पोलिसांना जाग आली असून, त्यांनी मंगळवारी सदर दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आत्मदहनासाठी कुटुंबीय दिल्लीला रवाणा होताच फसवणुकीचा गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 6:38 PM
अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीला आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना होताच जुने शहर पोलिसांनी मंगळवारी फसवणूक करणाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देसुनील श्रीराम ठाकरे आणि मंगेश धोटे या दोघांनी अग्रवाल यांची फसवणूक केली होती. त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली.न्याय न मिळाल्याने १५ आॅगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्याचे पत्र लिहून गोपाल अग्रवाल यांचे कुटुंबीय रविवारी दिल्लीला रवाणा झाले.