अकोला : कृषी अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांना जाणीवपूर्वक ‘पोक्रा’ योजनेपासून वंचित ठेवल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश देत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी एक महिन्याचा अल्टीमेटम दिला.जिल्हा कृषीविषयक आढावा बैठकीसाठी शनिवारी कृषी मंत्री दादाजी भुसे अकोला दौºयावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी प्रामुख्याने ‘पोक्रा’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला. दरम्यान, तालुकास्तरावर कृषी अधिकाºयांकडे प्रलंबित प्रकरणांबाबत जाब विचारला; पण समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तालुका कृषी अधिकाºयांना धारेवर धरले. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी सर्वच दस्तऐवजांची पूर्तता केल्यानंतरही त्यांना जाणीवपूर्वक योजनेपासून वंचित ठेवणाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.पाच जिल्ह्यांसाठी थांबवावी लागली राज्याची योजना!पोक्रा योजनेंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये ५ हजार १४७ गावांचा समावेश आहे. त्यापैकी १० जिल्ह्यांची कामगिरी उत्तम असली, तरी पाच जिल्ह्यांची कामगिरी चिंताजनक आहे. यामध्ये अकोल्यासह नागपूर, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या जिल्ह्यातील पोक्राची कामगिरी सुधारण्यासाठी या पाच जिल्ह्यांचा आढावा प्रामुख्याने घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना ‘पोकरा’ योजनेपासून वंचित ठेवणाऱ्यांना निलंबित करा! - कृषी मंत्री दादाजी भूसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 11:31 AM