लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : कामे प्रलंबित ठेवणारे ग्रामसेवक आर.के. बोचरे यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निलंबित करण्याचा आदेश गट विकास अधिकार्यांना दिले. तसेच कामात हलगर्जी करणार्या काही ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिस बजावली. जिल्हाधिकार्यांनी येथील पंचायत समिती सभागृहात ११ ऑगस्ट रोजी आढावा सभा घेतली. ही सभा विविध मुद्यांनी चांगलीच गाजली. या सभेला उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मुख्य कार्यपालन अधिकारी एस. रामामूर्ती, पातूर तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, जिल्हा कृषी अधीक्षक निकम यांची मंचावर उपस्थिती होती. आढावा सभेमध्ये कुपोषित बालक, घरकुल, शेततळे, शौचालय योजना, प्रगतिशील १0२ शेतकर्यांना रेशीम शेती आणि लिंबू शेताबाबत गटशेती योजना, वृक्ष लागवड, आधार नोंदणी, लोकशाही दिवस, महिला लोकशाही दिवस, मनरेगाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
कामे प्रलंबित ठेवणारे ग्रामसेवक बोचरे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:36 AM
पातूर : कामे प्रलंबित ठेवणारे ग्रामसेवक आर.के. बोचरे यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निलंबित करण्याचा आदेश गट विकास अधिकार्यांना दिले. तसेच कामात हलगर्जी करणार्या काही ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिस बजावली.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निलंबित करण्याचा आदेश गट विकास अधिकार्यांना दिलेकाही ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिस बजावली