मॅथ्स विस्डम या परीक्षेत संस्कृतीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आठवे स्थान तर वर्ग ६ वीची समृद्धी हरिश्चंद्र काळंके हिने सायन्स विस्डम या परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळविले आहे. त्याचप्रमाणे वर्ग ४ थीची राजस्वी नारायण शेगोकार हिने मॅथ्स विस्डम या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चौथे स्थान मिळविले आहे. वर्ग ३ रीची तनुश्री धनंजय चव्हाण हिने सुद्धा मॅथ्स विस्डम या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकली आहे. कोरोनाच्या विपरीत परिस्थितीही विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शाळेतील विषय शिक्षिकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, संस्थेचे सचिव मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य अनघा देव, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर यांनी कौतुक केले आहे.
फोटो: तीन विद्यार्थिनी