शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

‘स्वाभिमानी’ने तोडली महावितरण कार्यालयाची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:56 AM

Swabhiman Shetkari Sanghatna स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी थेट महावितरणच्या बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाचीच वीज तोडून टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांकडून महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे. देयकाचा भरणा केला नाही म्हणून थेट फीडरवरून वीजपुरवठा बंद करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी थेट महावितरणच्या बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाचीच वीज तोडून टाकली. १५ मार्च रोजी दुपारी तुपकर यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरणच्या अभियंत्यांसह कर्मचारीही गोंधळून गेले होते. सोबतच महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना तुपकरांनी केबिनमध्येच डांबून ठेवले होते.दरम्यान, जोपर्यंत खंडित करण्यात आलेली वीज जोडणी पूर्ववत जोडली जात नाही, तोवर अधीक्षक अभियंत्यांच्या केबिनमधून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. परिणामी महावितरणने दुपारपर्यंत ६० वीज रोहित्रांचा तोडलेला वीजपुरवठा पूर्ववत केला होता. मात्र सर्वच जोडण्या पूर्ववत करण्याची मागणी आक्रमकपणे तुपकरांनी रेटल्यामुळे अधिकारी वर्गालाही गप्प व्हावे लागले.अलीकडील काळात अशा प्रकारचे हे एक आक्रमक आंदोलन म्हणावे लागेल. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. त्यातच मुख्यालयाची वीज तोडल्याने कार्यालय अंधारात होते.  शेतकऱ्यांना अंधारात ठेवाल तर तुम्हाला उजेडात राहू देणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही या वेळी तुपकरांनी अधिकाऱ्यांना दिला होता. महावितरणच्या या मोहिमेच्या विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी केली होती. तसे झाल्यास महावितरणचीच वीज खंडित करू, असा इशारा त्या वेळी तुपकरांनी दिला होता. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह थेट महावितरणचे जिल्हा मुख्य कार्यालय गाठत तेथील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली होती. शेतकऱ्यांना लाखांची दिली गेलेली देयके ते टप्प्याटप्प्याने भरत आहेत. मात्र वसुलीसाठी शेतकऱ्यांना जोरजबरदस्ती करू नका अन्यथा शेतकरी भडकतील, असा इशाराही तुपकर यांनी या वेळी अधीक्षक अभियंता यांना दिला. त्यांची आक्रमकता पाहता देवहाते यांनी अमडापूर फिडरवरील ६० वीज रोहित्रांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत केला. उर्वरित ठिकाणचाही वीजपुरवठा जोडण्याचे काम सुरू होते. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, पवन देशमुख, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, शेख रफिक शेख करीम, अंकुश सुसर, गोटू जेऊघाले यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

तुम्ही पण अंधारातच राहा!‘आम्ही अंधारात तर तुम्ही पण अंधारात’ या भूमिकेतून आमचा शेतकरी आता वागेल. वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित केला गेला तर आम्हीही महावितरण कार्यालयाची वीज कापू, असा इशारा तुपकरांनी दिला आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असेही तुपकर म्हणाले. दरम्यान, अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतरही सक्तीने वीज देयकांय्या वसुलीचे ऊर्जामंत्री वक्तव्य करतात. त्यामुळे सरकारमध्येच आपसात ताळमेळ नसल्याची टीका तुपकर यांनी केली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा