निंबा फाटा येथील व्यावसायिकांच्या जागेत बांधलेल्या नाल्यांचा मोबदला कमर्शिअल दराच्या ५ पट दराने देण्यात यावा, शेगाव-देवरी रोडमध्ये लोहारा, निंबा फाटा, नया अंदुरा, अंदुरा व इतर गावी बांधण्यात आलेल्या नाल्या नियमबाह्य पद्धतीने बांधण्यात आल्या. सर्व ठिकाणच्या नाल्या तोडून पुन्हा बांधण्यात याव्यात. इगल कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केले असून, त्याची चौकशी करून इगल कंपनीला जबाबदार धरून काळ्या यादीत टाकावे, रोडच्या बाजूने शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते नियमानुसार बांधून द्यावेत, रस्त्याच्या कडेला नियमानुसार झाडे लावली नसून, पर्यावरण विभागाचे नियम मोडले आहे. रोडच्या कामात भष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणारे कार्यकारी अभियंता झाल्टे व उपअभियंता आडसुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व व्यापारी निंबा फाटा यांच्यातर्फे शेतकरी संघटना अध्यक्ष गणेश खुमकर, श्यामराव कौसकार, बळीराम मुरलीधर उगले, मधुकर झाडे, प्रवीण राऊत, मोतीराम भारती, पद्माकर बुटे उपोषण करीत आहेत. मागण्या होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
फोटो: