अकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम योजनेतील लाभार्थींनी बांधकाम पूर्ण करावे, शौचालय बांधकामासाठी दिला जाणारा निधी ३१ डिसेंबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच कामे पूर्ण करून देयकाची रक्कम अदा करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्याने शौचालय बांधण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्यात आली. प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करून त्यासाठी ३,८०० शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर शौचालय निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात किती लाभार्थी शौचालय बांधण्यास तयार आहेत, त्याची यादी तयार झाली. लाभार्थीनिहाय निर्माण गट जोडण्यात आले. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना फॉर्म देऊन युनियन बँकेकडून कर्ज घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. शौचालय बांधण्यास तयार नसलेल्या लाभार्थींना नरेगामधून बांधकाम करणे, रोजगार सेवकासोबत समन्वय ठेवून काम करावे, ३८०० शौचालयांची निर्मिती कोणत्याही परिस्थितीत करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. आता शौचालयांसाठी मिळणारा निधी ३१ डिसेंबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांना शौचालय बांधकाम करावयाचे आहे, त्यांनी निर्मितीसाठी पुढे यावे. बेसलाइन सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांचा पुन्हा एकदा सर्वेक्षण करणे, त्यापैकी वैयक्तिक शौचालय नसलेल्या सर्व कुटुंबांना शौचालय बांधकामाचा परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावे, असेही निर्देश देण्यात आले.विशेष म्हणजे, जिल्ह्यातील २१२ पैकी १४७ ग्रामपंचायतींमध्ये ही कामे पूर्ण झाली आहेत. तर ६५ ग्रामपंचायतींना ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली. आता नव्याने शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट दिले जाणार आहे.
उद्दिष्ट अपूर्ण असलेल्या ग्रामपंचायती
तालुका ग्रामपंचायती शौचालयअकोला १० १५२अकोट २१ ५७८बाळापूर १० १०१बार्शीटाकळी १४ ९८मूर्तिजापूर ४ ४पातूर ० ०तेल्हारा ६ १६१