बाळापूर बाजारपेठेत वाढली गर्दी
बाळापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाळापूर शहरातील बाजार शनिवारऐवजी शुक्रवारी रस्त्यावरच भरला. या आठवडी बाजारात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच काही विक्रेते व ग्राहक विनामास्क फिरताना दिसून आले.
---------------------------------
व्याळा-नांदखेड रस्त्याचे काम संथ गतीने
बाळापूर : व्याळा-नांदखेड रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर गिट्टी आथरल्यामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
---------------------------------
गुरांचे बाजार बंद असल्याने शेतकरी त्रस्त
बोरगावमंजू : परिसरातील सांगळूद बु. येथे दर शनिवारी गुरांचा बाजार भरतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरांचे बाजार बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गुरांच्या बाजाराला परवानगी देण्याची मागणी होत आहे.
--------------------------
तेल्हारा शहरात धुळीचे साम्राज्य
तेल्हारा : शहारात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत. शहरात बांधकामे सुरू असल्याने साहित्य रस्त्यावरच पडून आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र धूळ पसरत असून, शहवासीयांचे आरोग्य धोक्यात ्आले आहे.
-------------------------
भुईमुगाच्या पेरणीत वाढ
बार्शिटाकळी : गतवर्षी चांगला पाऊस बरसल्याने विहिरी व कुपनलिकांना मुबलक पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यात उन्हाळी पेरणी वाढली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी भुईमुगाला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
-----------------------------------
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित
अकोट: गतवर्षी खरीप हंगामात सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. सद्य:स्थितीत गहू पिकाची काढणी सुरू असून, गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतित आहेत.
-----------------------------
विजया मुळे यांचे निधन
अकोला: कौलखेड येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या विजया दत्तात्रय मुळे यांचे दि. ७ मार्च २०२१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)