मागील वर्षांपासून कोरोना आजाराच्या साथीने शेतकर्यांना मेटाकुटीला आणले आहे लॉकडाऊनमुळे पडलेले बाजारभाव व शेतीकामासाठी मजुरांचा अभाव अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत या संकटामधे त्यांना काहीअंशी दिलासा देण्यासाठी अकोला जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत तसेच, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्वयंभू गणेश शेतकरी उत्पादक गट कापशी तलाव यांनी गटातील शेतकऱ्यांसह गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक कपाशी लागवड यंत्राने ना नफा, ना तोटा या तत्त्वावर कपाशी लागवड करून देण्याचे ठरविले असून, आज या कामाचा श्रीगणेशा गावातील अल्पभूधारक शेतकरी शैलेष येवले यांचे शेतात करण्यात आला. सदर यंत्रामुळे कमी वेळात पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप जास्त काम होते. शिवाय मोठी आर्थिक बचतही होते. या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन गटाचे अध्यक्ष पुरुषोत्तम चतरकर व सचिव वसंतराव चतरकर यांनी केले. याप्रसंगी गावातील शेतकरी मनोहर येवले, रवींद्र पाटील, विश्वनाथ खंडारे, गोपाल मानतकर, शैलेश येवले, नारायण लेंभाडे, राम चतरकर, मोहन चतरकर, संतोष पाटील, संजय पाटील, उकर्डा पाटील, विलास पाटील, विठ्ठल चतरकर, प्रवीण चतरकर, तात्यासाहेब पागृत, गोपाल चतरकर, अनंता खंडारे उपस्थित होते.
फोटो: