जिल्ह्याला दररोज लागते साखर (क्विंटलमध्ये)
५० टन
श्रावण महिन्यात मागणी वाढली
३ टन
साखरेचा दर (प्रतिकिलो)
जानेवारी - ३७
फेब्रुवारी - ३६
मार्च - ३२
एप्रिल - ३२
मे - ३३
जून - ३४
जुलै - ३४
ऑगस्ट - ३५
का वाढले भाव?
साखरेचा वापर हा इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे, तसेच बाजारात चांगल्या दर्जाच्या साखरेची कमतरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम साखरेच्या दरावर दिसून येत आहे. ठोकमध्ये २०० रुपये क्विंटलपर्यंत दरवाढ झाली.
-व्यापारी
श्रावण महिन्यापासून सण-उत्सवांचा काळ सुरू होतो. त्यामुळे सर्वत्र साखरेची मागणी वाढते. यंदाही असेच दिसून येत आहे. काही प्रमाणात साखरेच्या दरावरही परिणाम झाला आहे. चिल्लरमध्ये ३६ रुपये किलो साखर पोहोचली आहे.
-व्यापारी
महिन्याचे बजेट वाढले!
आधीपासून तेलाच्या दरात वाढ होत असल्याने महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता साखरेच्या दरात वाढ झाली. त्यामुळे महिन्याचे बजेट आणखी वाढले आहे. महिन्याला लागणारा खर्चही वाढल्याने पुन्हा संकट उभे राहिले आहे.
-नलिनी जैन
कोरोनाकाळात व्यवसाय बंद असल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यात किराणा सामानात दरवाढ होत आहे. ऐनसणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे गोडधोड पदार्थ तयार करण्यावरही मर्यादा येणार आहे.
-मीना इंगळे