अकोला : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘स्वाइन फ्लू’ने जिल्ह्यातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून, या संसर्गजन्य आजाराचा संशयित रुग्ण आढळला असून, सदर महिलेवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत या आजाराचे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. दोघांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराचा प्रसार एच-१ एन-१ या विषाणूंपासून हवेच्या माध्यमातून झपाट्याने होतो. शहरात या आजाराचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. शनिवारी आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून, त्याच्यावर एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पारस येथील एका महिलेस स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यानंतर तिला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर महिलेचे नमुने घेण्यात आले असून, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
‘स्वाइन फ्लू’चा संशयित रुग्ण आढळला
By admin | Published: April 10, 2017 1:00 AM