येथील अकरा सभासद संख्या असणाऱ्या ग्रामपंचायत आगर गावातील सरपंच/उपसरपंच पदाची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, या निवडणुकीमध्ये वाॅर्ड क्रमांक दोन वगळता कुठल्याही वाॅर्डामध्ये कुठल्याही पॅनलला बहुमत न मिळाल्याने गावातील पराभूत उमेदवार व तसेच विरोधी उमेदवार यांनी शासन निर्णयाचा आधार घेत, विजयी उमेदवार यांच्या नावाने व परिवारातील व्यक्तींच्या नावाने शासकीय जागेवर राहत असल्याचा आक्षेप घेत, नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. तसेच काही विजयी उमेदवार यांना तीन अपत्य असल्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे सरपंच व सत्ताधारी गटातील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याविरुद्ध प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात होते. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:18 AM