शासनाने तातडीने पाेलीस भरती करण्याची मागणी हाेत आहे.
शहरासह ग्रामीण भागात बारावीनंतर अनेक युवक पाेलीस भरतीची तयारी करीत आहेत. शारीरिक चाचणीसह लेखीपरीक्षांची जाेरदार तयारी युवक करीत आहेत. दाेन ते तीन पाेलीस भरतीत काही गुणांनी नियुक्ती न मिळालेले तरुण आणखी जाेमाने तयारी करीत आहेत. यावर्षी काेराेनामुळे पाेलीस भरती हाेईल किंवा नाही याविषयी संभ्रम हाेता. मात्र, शासनाने पाेलीस भरतीचा जीआर प्रसिद्ध केला हाेता. त्यामुळे, युवकांना दिलासा मिळाला हाेता. मात्र शासनाने हा जीआर रद्द केल्याने चार ते पाच वर्षांपासून तयारी करीत असलेल्या युवकांमध्ये अपात्र हाेण्याची भीती आहे.
१००० लोकांमागे एक पोलीस
जिल्ह्यात पाेलिसांची २७३२ पदे मंजूर आहेत. त्यातील १६३ पदे रिक्त आहेत. सन २०११च्या जनगणनेनुसर जिल्ह्याची लाेकसंख्या २६ लाखांपर्यंत आहे. लाेकसंख्येचे प्रमाण पाहता एक हजार लाेकांमागे साधारणत: एक पाेलीस असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात संख्येच्या तुलनेत पाेलिसांची पदे वाढवण्याची गरज आहे.