शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:45 AM

अकोला : पेट्रोल व डिझेलचे दर ९० रुपयांवर पोहोचले असून वाहनधारक या दरवाढीमुळे त्रस्त झाले आहेत. शिवाय पेट्रोल व ...

अकोला : पेट्रोल व डिझेलचे दर ९० रुपयांवर पोहोचले असून वाहनधारक या दरवाढीमुळे त्रस्त झाले आहेत. शिवाय पेट्रोल व डिझेलवर अनेक प्रकारचे व्यवसाय अवलंबून आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, माजी नगरसेवक पंकज गावंडे, महानगर अध्यक्ष करण दोड यांच्या नेतृत्वात स्थानिक बसस्थानक चौकात दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून दुचाकीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही दरवाढ अशीच कायम राहिली तर पुन्हा बैलगाडी वापरण्याची वेळ किंवा घोडेस्वारी करण्याची वेळ येऊ शकते या बाबीचे प्रतीक म्हणून आंदोलनात बैलगाडीवर दुचाकी बांधण्यात आली व घोडस्वार आंदोलनात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात जोरदार नारेबाजी करून या वेळी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोमुळे वाहनधारकांना थोडा त्रास झाला, तरीही त्यांच्याकडून व सामान्य नागरिकांकडून या आंदोलनाचे व मागणीचे समर्थन करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे महानगर अध्यक्ष मिलिंद गवई, माजी नगरसेवक फजलू पहेलवान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण ठाकरे, राम म्हैसणे, चैतन्य लाखे यांच्यासह हर्षल ठाकरे, ताज राणा, श्रीकांत साबळे, पवन सावरकर, शीलवंत खंडारे, शिव ठाकरे, प्रणव तायडे पाटील, कुंदन धुरंदर, बाळासाहेब तायडे, अभिषेक खंडारे, हर्षद खडसे, वैभव मानकर, प्रशांत थोरात, अजिंक्य टेपरे, संतोष इंगळे, अफीफ कुरेशी, मोहम्मद अदनान, इजहार अहमद, साहिल अहमद, मोहन शेळके आदी सहभागी झाले हाेते.