अकोला : जुने शहरातील हरिहर पेठ येथील रहिवासी तसेच जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या आरोपीस बेकायदेशीर वास्तव्य करत असताना शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी अटक केली. या आरोपीकडून एक शस्त्र ही जप्त करण्यात आले आहे.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहर पेठ येथील रहिवासी गजानन किसन इंगळे वय ५२ वर्ष हा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे. मात्र तरीही आरोपी तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव करीत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने आरोपीस अटक केली. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे १४२ मुंबई पोलीस कायदा व शस्त्र जप्त केल्या प्रकरणी ४/२५ आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, सचिन कदम यांच्या विशेष पथकाने केली.