- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यातील पिकांचे नुकसान आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक मदतनिधीचे प्रस्ताव १९ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना दिला होता; मात्र मुदत संपून नऊ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, २७ नोव्हेंबरपर्यंत एकाही तालुक्यातून मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुष्काळी मदतनिधीचे प्रस्ताव सादर करण्यात संबंधित पाचही तहसीलदारांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत खरीप पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ नोव्हेंबर रोजी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसीलदारांना दिला होता. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपून नऊ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र २७ नोव्हेंबरपर्यंत एकाही तालुक्यातून दुष्काळी मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याच्या कामात संबंधित तहसीलदारांकडून कानाडोळा करण्यात करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे.दुष्काळी मदतीच्या प्रतीक्षेत असे आहेत शेतकरी!तालुका शेतकरीअकोला ६५७३०बार्शीटाकळी ४०६४६तेल्हारा २७४९०बाळापूर २२२२८मूूर्तिजापूर ३८६८०.......................................एकूण १९४७७४शासनाकडे केव्हा सादर होणार प्रस्ताव !जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या मदतनिधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील महसूल मंडळनिहाय पीक नुकसानाचे क्षेत्र आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक असलेला मदतनिधी यासंबंधीचे प्रस्ताव सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांना दिला; मात्र दुष्काळग्रस्त पाचपैकी एकाही तालुक्यातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधीचा प्रस्ताव शासनाकडे केव्हा सादर होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीक नुकसानाचे असे आहे वास्तव!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ८६ हजार ६२३ हेक्टर, बार्शीटाकळी तालुक्यात ५१ हजार ५६२ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ५३ हजार ३६ हेक्टर, बाळापूर तालुक्यात ६० हेक्टर ५९१ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यात ६५ हजार ४७२ हेक्टरवरील पीक नुकसानाचा समावेश आहे.