अकाेला : आपल्या माेबाइलवर विविध आमिष दाखविणाऱ्या, तसेच केवायसीच्या नावाखाली येणाऱ्या लिंक तुमची लाखाे रुपयांनी फसवणूक करू शकतात, अशा प्रकारच्या तक्रारी सायबर सेलकडे वाढल्या असून, अनेकांचे बॅंक खात्यातील पैसेही या लिंक उघडल्यामुळे गायब झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अनाेळखी लिंक ओपन करू नये, असे आवाहन सायबर पाेलिसांनी केले आहे. सायबर चाेरट्यांचा गत काही वर्षांमध्ये प्रचंड धुडगूस घालत आहेत. बॅंका बंद राहतील, अशा दाेन दिवसांमध्ये सायबर चाेर माेबाइलवर विविध आमिष देणाऱ्या लिंक पाठवितात. त्यानंतर, लिंक ओपन करताच, माेबाइलधारकाची संपूर्ण माहीती एकत्रित करून, खात्यातील पैसे पळविण्याचा प्रयत्न करतात. विविध लिंक पाठविताना आता सायबर चाेरट्यांनी बॅंक केवायसीचा नवीन फंडा वापरला असून, केवायसीची अंतिम मुदत जवळ आल्याने, केवायसी करण्याच्या नावाखाली एक लिंक पाठविण्यात येते. त्यानंतर, ही लिंक ओपन करताच, खात्यातील रक्कम पळविल्याच्या अनेक घटना समाेर आल्या आहेत. या प्रकरणाच्या तक्रारी सायबर सेलकडे करण्यात आलेल्या असून, अनेक प्रकरणात पाेलिसांनी पैसेही परत मिळविले आहेत.
आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याला शासनाकडून दाेन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याच मुदतवाढ मेसेजचा फायदा घेत, सायबर चाेरट्यांनी एक लिंक तयार करून, केवायसी करण्यासाठी ही लिंक असल्याचा मेसेज माेबाइलधारकाला पाठविला. त्यानंतर, ग्राहकाने लिंक ओपन करताच, त्यांच्या खात्यातील पैसे पळविल्याचा प्रकार रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एकासाेबत घडला आहे.
विमान तिकीट रद्द करण्याची वेबसाइट सर्च करीत असतानाच, एका फेक वेबसाइटची लिंक कापशी येथील माेबाइल ग्राहकाला पाठविण्यात आली. त्यानंतर, ग्राहकाने या लिंकवर माहिती सादर करताच, त्यांच्या खात्यातील सुमारे ५५ हजार रुपयांची रक्कम गायब करण्यात आली. मात्र, त्यांनी या प्रकरणाची तक्रार तातडीने केल्यानंतर सायबर पाेलिसांनी ही रक्कम परत आणल्याची माहिती आहे.
केबीसीमध्ये तुमचा नंबर लागला असून, प्राेसेसिंग फी म्हणून ७ हजार ते २० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर अकाेल्यातील अनेकांनी ही रक्कम भरली. मात्र, त्यानंतर फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा तपास सायबर पाेलिसांनी सुरू केला. मात्र, धागेदाेरे थेट पश्चिम बंगालमध्ये निघाल्यानंतर पाेलिसांनाही ती रक्कम परत आणण्यात अडचणी आल्या आहेत़
२० लाखांची रक्कम मिळविली परत
जिल्ह्यातील अनेकांची विविध प्रकरणात फसवणूक करण्यात आली असून, त्यांच्या बॅंक खात्यातून, तसेच एटीएममधून पैसे पळविले आहेत. मात्र, ज्यांचे पैसे खात्यातून गायब झाले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाेलिसांकडे तक्रारी केल्या, अशा प्रकरणात अकाेला सायबर पाेलिसांनी तब्बल २० लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे, ही माेठी कामगिरी असून, ग्राहकांनी अकाेला सायबर पाेलिसांचे काैतुकही केले आहे.
माेबाइलवर किंवा लॅपटाॅप, तसेच संगणक हाताळताना तुम्ही एखादी गाेष्ट सर्च केल्यानंतर, त्याच संबंधित वेबसाइट आणि लिंक तुमच्या समाेर वारंवार येतात. त्यामुळे एखाद्या वेळी अशा प्रकरणात फसवणूक हाेऊ शकते. एवढेच काय, तर विविध आमिष व लाॅटरी लागल्याचे मेेसेज आणि लिंकही तुमच्या खात्यातील पैसे गायब करतात. त्यामुळे अशा प्रत्येक गाेष्टीपासून सावध राहणे गरजेचे आहे.
माेनिका राऊत, अपर पाेलीस अधीक्षक अकाेला.