शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दक्षता घ्या! सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

By रवी दामोदर | Published: April 06, 2024 6:35 PM

सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून, अंगणवाडी सेवीका सहायक म्हणून काम करतात.

अकोला: जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी गावात बालविवाह होणार नाही याची खबरदारी ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांनी घ्यावी, अशा सुचना शनिवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या आहेत.  

सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून, अंगणवाडी सेवीका सहायक म्हणून काम करतात. शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी हे बाल विवाहप्रतिबंध अधिकारी आहेत. गावांमध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ग्राम बाल संरक्षण समित्या गठित असून, ग्राम बाल संरक्षण समितीचे सरपंच अध्यक्ष असून पोलीस पाटील हे त्या समितीचे सदस्य आहेत. 

त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधित कोणत्याही अघटित घटना होणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण आहे. गुढीपाडवा सण दि.९ एप्रिल रोजी आहे. यादिवशी अनेक देवस्थानांच्या ठिकाणी यात्रा, उत्सव असतो. त्याचप्रमाणे, विवाह सोहळेसुध्दा आयोजित केले जातात. या दिवशी जिल्ह्यात कोठेही बाल विवाह होणार नाही याची दक्षता गावचे सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी घेणे आवश्यक आहे.

...वाजंत्री व मंडपवाल्यांवरही होऊ शकते शिक्षाबालविवाह झाल्यास  विवाह सोहळ्यातील मंडपवाले, वाजंत्री, सहभागी मंडळी, मंगल कार्यालयमालक, वर व वधूचे आई वडील यांना शिक्षा होऊ शकते. तसेच ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांच्यावरही कार्यवाही प्रस्तावित केली जाऊ शकते. त्यामुळे तसे घडू नये याची दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :marriageलग्नcollectorजिल्हाधिकारीsarpanchसरपंच