जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सिरसाम आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूसंख्या, रुग्णालयांचे फायर ऑडीट, ऑक्सिजन उपलब्धता व लसीकरण मोहिमेचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला. जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्लांटबाबत माहिती घेऊन प्लांटची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, तसेच ग्रामीण भागात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गृह अलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचे संस्थागत अलगीकरण करून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यावेळी दिल्या.
‘जीएमसी’तील ऑक्सिजन प्लांट,
सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलची पाहणी !
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथील ऑक्सिजन प्लांटला विभागीय आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली, तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील जम्बो कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची पाहणीही विभागीय आयुक्तांनी केली.
.........................फोटो.........................................