- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विषमुक्त अन्न, भाजीपाला उत्पादनासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु महिला शेतकरी वंदना धोत्रे गत ९ वर्षापासून प्रत्यक्ष सेंद्रिय फळे, भाजीपाला उत्पादन घेत असून, अकोलेकरांना हा भाजीपाला उपलब्धही करू न देत आहेत. सेंद्रीय शेती उत्पादनाचा त्याचा हा प्रकल्प इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.पातूर तालुक्यातील विवराच्या महिला शेतकरी वंदना धोत्रे यांच्याकडे ४ एकर शेती आहे.हेच त्यांच्या उपजिवीकेचे साधन आहे.रासायनिक शेतीचा धोका वाढल्याने यावर उपाय म्हणून त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा ध्यास घेतला. याकरिता त्यांनी सुरुवातीला सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला.यातूनच त्यांनी २०११ पासून बायोडायनामिक सेंद्रिय शेती करण्यात सुरुवात केली. २०१४ पासून त्या प्रमाणित सेंद्रिय शेती करीत आहेत. अर्थात यासाठी त्यांना त्यांचे पती देवीदास धोत्रे यांची मोठी साथ आहे. सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासह त्या बुनियाद केंद्र चालवतात. तद्वतच बायोडायनामिक सेंद्रिय शेती कशी करावी, यासाठीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करीत आहेत.चार एकरावर सेंद्रिय शेती करणे याला धाडसच हवे; परंतु त्या ज्या पद्धतीने सेंद्रिय शेती करतात हा एक आदर्शच आहे. त्यांच्या शेतात सर्व प्रकारच्या भाज्या तसेच फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या शेतात निर्मित भाजीपाला आठवड्यातील तीन दिवस अकोल्यातील गोरक्षण रोडवर विक ण्यात येतो. सुरुवातीला यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले. आजमितीस त्या दररोज १ हजार रुपये निव्वळ नफा मिळवित असून, शेती उत्पादनावरच त्यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा सेंद्रिय शेती करण्याचा लौकिक सर्वत्र पसरला असून, सेंद्रिय शेती बघण्यासाठी केंद्रीय सहसचिव राणी कुमोदिनी, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी भेट दिली. आतापर्यंत ३ हजारांवर शेतकरी शेती बघून गेले. अकोला कृषी विज्ञान केंद्राने त्यांचा गौरव केला आहे. यासाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
नागरिकांना विषमुक्त फळे, भाजीपाला नियमित मिळावीत म्हणून माझे पती आणि मी सेंद्रिय शेती करीत आहे. आम्ही दोघे प्रमाणित सेंद्रिय भाजीपाला व फळे विक्री करतोय.-वंदना धोत्रे,विवरा.